
MNS: हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या पुढाकाराने होणारा मोर्चा ६ जुलै रोजी नियोजित होता. परंतु हा मोर्चा आता एक दिवस आधीच ५ जुलै रोजी होणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. ६ तारखेला आषाढी एकादशी असल्याने मोर्चाची तारीख बदलल्याचं बोललं जातंय.
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।