राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, सही करून पत्रच लिहिलं

महाराष्ट्रात योगी कुणीच नाहीत, केवळ सत्तेचे भोगी; राज ठाकरेंकडून योगींच तोंडभरून कौतुक
politics
politicssakal
Summary

महाराष्ट्रात योगी कुणीच नाहीत, केवळ सत्तेचे भोगी; राज ठाकरेंकडून योगींच तोंडभरून कौतुक

सध्या मशिदीवरील भोंगे काढून टाकण्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला धारेवरं धरलं आहे. आता यासंदर्भातील आणखी एक बातमी समोर येत आहे. या राजकीय नाट्य घडामोडींनंतर आता उत्तर प्रदेशात मिशिदींवरील भोंगे उतरवल्यबद्दल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं असून यात त्यांनी योंगीचं कौतुक केलं आहे.

हे पत्रक राज ठाकरे यांनी ट्विट केल असून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यात राज ठाकरे म्हणतात, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीचन नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीची आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्याबाबत आणि आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास ११ हजार भोंगे हटवण्यात आले. तर ३५ हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित गेली गेली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्याच्या आवाजाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून ही मोहीम सुरु करण्यात आली. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानतंर त्यांनी ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला होता. यावर राज्य सरकारने आपण भोंगे उतरवू शकत नाही असं सांगितलं. केंद्राने याबाबत निर्णय घेतल्यास आम्ही त्याप्रमाणे लागू करू असंही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com