esakal | राज्यांच्या स्वायत्ततेचा आवाज बनाल! राज ठाकरेंच्या ममता बॅनर्जींना शुभेच्छा

बोलून बातमी शोधा

raj thackeray mamta banergee
ममता दिदी राज्यांच्या स्वायत्ततेचा आवाज बनतील! - राज ठाकरे
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेस सहज सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 208 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे