राज ठाकरेंनी एक फोन फिरवला आणि कोरोना काळात ग्रंथालयं सुरु झाली... | Raj Thackeray Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray one phone Corona period libraries started Pune

राज ठाकरेंनी एक फोन फिरवला आणि कोरोना काळात ग्रंथालयं सुरु झाली...

राज ठाकरेंची प्रेस असो की एखादा नेता त्यांना भेटायला गेलेला असो. राज ठाकरेंच्या फोटोंमध्ये नेहमी त्यांच्या मागे पुस्तकांची लायब्ररी दिसते. राज ठाकरे पुस्तकं वाचत असल्याचे फोटो सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असतील. 

मंगळवारी राज ठाकरे पुणे दोऱ्यावर असताना त्यांनी एका पुस्तकाच्या दुकानातून तब्बल ५० हजारांची पुस्तकं विकत घेतली. या आधी सुद्धा अनेक भाषणांमध्ये राज ठाकरेंनी पुस्तकांचे संदर्भ दिले होते. आपल्या आजोबांची सगळी पुस्तकं आपण वाचली आहेत असं देखील ते म्हणाले होते. राज ठाकरे राजकारणाबरोबरच पुस्तकांमध्ये सुद्धा रमत असतात. त्यांच्याकडे पुस्तकांबरोबरच हजारांहून अधिक सिनेमांचा संग्रह सु्द्धा आहे. रोज एक तरी सिनेमा बघण्याचा त्यांचा कयास असतो. (Raj Thackeray Corona period one phone libraries started Pune)

हेही वाचा: मविआनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांचा हल्लाबोल

त्यांच्या वाचनाच्या आवडीचा प्रचिती देणारा प्रसंग कोरोनामध्ये घडला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर २०२० साली राज्य सरकारने मिशन बिगन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु केल्या होत्या. परंतु ग्रंथालये बंदच होती. 8 ऑक्टोबरला ग्रंथालय प्रतिनिधिंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यात त्यांनी ग्रंथालय सुरु व्हावीत अशी मागणी केली होती. पुस्तकं ही सकारात्मक उर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्यांची फार आवश्यकता आहे. म्हणून ती खुली करावित अशी ग्रंथालय प्रतिनिधींची मागणी होती.

हेही वाचा: VIDEO : राज ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले; म्हणाले, जगू द्याल का?

त्यानंतर लगेचच राज ठाकरेंनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करुन ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरु करण्याच निर्णय घेतला जाईल असं आश्यावसन उदय सामंत यांनी दिलं होते. त्यानंतर प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली आणि अवघ्या ७ दिवसातच राज्य सरकारने ग्रंथलायं सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने १४ ऑक्टोबरला नवी नियमावली जाहीर केली होती त्यात ग्रंथालये सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती. हे सगळं घडलं राज ठाकरे यांच्या एका फोननंतर.

Web Title: Raj Thackeray Corona Period One Phone Library Started Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top