"कोरोनामध्ये सोनू सूद नावाच्या 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण..."

"कोरोनामध्ये सोनू सूद नावाच्या 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण..." ठाकरे यांनी केली 'बॉलिवूडचा मसीहा' सोनू सूदवर केली जोरदार टीका Raj Thackeray Led MNS Leader Sharmila Thackeray angry on Sonu Sood for not helping flood affected people in Konkan Maharashtra vjb 91
Raj-Thackeray-Sonu-Sood
Raj-Thackeray-Sonu-Sood

ठाकरे यांनी केली 'बॉलिवूडचा मसीहा' सोनू सूदवर केली जोरदार टीका

गेले काही दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने अखेर काही दिवस विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने रौद्ररुप धारण केल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण आणि रायगडसह इतर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर कुठे नदीतील पाण्यामुळे पूरपरिस्थिती ओढवली. कोकण हा किनारपट्टीलगतचा प्रदेश असल्याने तेथे बहुतांश नुकसान झाले. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकांनी श्रमदान व आर्थिक सहाय्य पुरवत या पूरबाधितांना आधार दिला. पण या साऱ्यामध्ये मनसेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची आठवण झाली. कोरोनाकाळात लोकांसाठी 'मसीहा' बनून मदतीला धावणारा सोनू सूद राज्यातील लोकांच्या मदतीला का धावला नाही? असा सवाल मनसेने केला.

Raj-Thackeray-Sonu-Sood
फडणवीसांचं CM उद्धव ठाकरेंना पत्र, केल्या या 26 मागण्या

कोरोनाकाळात अनेक लोक आपल्या गावाकडे चालले होते. परप्रांतीयांना रस्त्यावरून चालत दिवसेंदिवस प्रवास करावा लागत होता. पण बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने यात जातीने लक्ष घालत त्या कामगार व स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण हाच सोनू सूद कोकणवासीयांची पूरानंतर मदत करण्यास का सरसावला नाही? असा सवाल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला.

Raj-Thackeray-Sonu-Sood
'प्रवासासाठी शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत येतील', मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?", असा रोखठोक सवाल त्यांनी सोनू सूदला केला. त्याचसोबत, #WhereisMasiha (मसीहा कुठे गेला?) असा हॅशटॅगही त्यांनी ट्वीट केला.

Raj-Thackeray-Sonu-Sood
"माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल

दरम्यान, पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. कुणाच्या घरावरील छप्पर नाहिसं झालं. या नैसर्गिक आपत्तीमधून प. महाराष्ट्र आणि कोकणातील लोक अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरातून त्यांना मदतीचा हातही दिला जातोय. मात्र, या पूरस्थितीमध्ये राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कोकण जायबंदी झाल्याचं चित्र आहे. पूरबाधित प्रदेशाला पूर्वपदावर येण्यासाठी काही वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

2019 मध्ये आलेल्या पूरातून सावरत असतानाच 2021 मध्ये पुन्हा एकदा आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला अन् होत्याचं नव्हतं करुन गेला. या नैसर्गिक आपत्तीत 209 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 400 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com