Raj Thackeray News : दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परळी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

हेही वाचा: Political News : अजितदादांवर आता शरद पवारांचाच विश्‍वास राहिला नाही; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट संदर्भात परळी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Men vs Women : महिलांना पाहताना पुरुष सर्वात पहिले कशाकडे होतात आकर्षित?

नेमकी घटना काय?

राज ठाकरेंना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. याचे पडसाद बीडमधील परळीत उमटले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती.

त्यानंतर कार्यकर्ते आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर राज ठाकरे हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

दोनवेळा राज यांना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती.

हेही वाचा: Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

त्यानुसार आज राज ठाकरे परळी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज यांच्याकडून न्यायालयाला अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

राज यांची ही मागणी न्यायालयाकडून राज यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावत जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केला.