Raj Thackeray| राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली पक्षातून काढण्याची धमकी; काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली पक्षातून काढण्याची धमकी; काय आहे कारण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींचा समचार घेतला. दरम्यान, पदाधिकाऱ्यांना त्यांनी पक्षातून काढण्याची धमकी दिली. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Raj Thackeray)

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील चर्चा सोशली मीडियावर रंगली असल्याची पाहायला मिळते. अनेक राजकीय नेत्यांमध्ये सोशल वॉर सुरू असतात. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मनसे नेता बाळा नंदगावकर यांनी सोशल मिडीयाचा मुद्दा उपस्थित केला. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.

काय म्हणाले राज ठाकरे?

उत्तरेकडे राजकारण महाराष्ट्रत सुरू झाल आहे. जनतेन जागं होण्याची गरज आहे. बाकिच्य पक्षांमध्ये धुडगूस चालु देत पणा माझ्या पक्षात हे चालणार नाही. बाळा नंदगावकरांच भाषण ऐकताना एक विषय मिळाला सोशल मीडियाचा मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरीत कॉमेंट केल्या तर त्याला एक क्षण भऱही पक्षात ठेवणार नाही.

तुमचे चोचले आत्तापर्यंत खुप पुरवले. झालं तेवढ खुप झालं. तुम्हाला तुमचं काम सांगायच असेल तर माध्यमांचा उपयोग करा. पण कोणी कोणाच्या विरोधात बोलं असेल तर त्याला माझ्यापर्यंत पोहचवा. माझ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Web Title: Raj Thackeray Officials Were Threatened With Removal From The Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj ThackeraySocial Media