
Raj Thackeray : "प्रकल्प जेव्हा बाहेर जात होते तेव्हा आमचं धोतर का नाही बोललं"
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटाध्यक्ष मेळावा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंनी राज्यपालांना चांगलंच झापलंय.
(Raj Thackeray On Governor Bhagat Singh Koshyari)
"ज्यावेळी महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात होते त्यावेळी आमचं धोतर का बोललं नाही. ते आज शिवाजी महाराजांवर बोलत आहेत. त्यांचं वय काय बोलता काय? मोठ्या पदावर बसला आहात म्हणून मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही" अशा शब्दांत ठाकरेंनी राज्यपालाचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यात चालेलेल्या अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नेत्यावर टीका केलीय.
राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा
"राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा आहे. माहिती नसताना सावरकरांवर टीका करायची. त्याला माहिती पाहिजे की, स्ट्रॅटेजी असते. ज्या व्यक्तीला ५० वर्षाची शिक्षा झाली होती तो व्यक्ती आपली स्ट्रॅटेजी वापरून लवकर बाहेर येतो आणि हंगामा करतो त्या व्यक्तीवर राहुल टीका करतो. त्यांच्या या गोष्टी राहुलला कळत नाही म्हणून तो गुळगुळीत मेंदूचा आहे." असं राज ठाकरे म्हणाले.
गांधी नेहरूंची बदनामी करणं थांबवा
जवाहरलाल नेहरू यांचे फोटो व्हायरल करून त्यांची बदनामी केले जाते. भाजपने गांधी-नेहरूवर टीका करायची आणि परत काँग्रेसने सावरकरांवर टीका करायची. पण हे थांबवलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले