Raj Thackeray : सोशल मीडियात व्यक्त होणाऱ्यांना 'असं' गप्प करता येईल; ठाकरेंनी सांगितला फॉर्म्युला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

Raj Thackeray : सोशल मीडियात व्यक्त होणाऱ्यांना 'असं' गप्प करता येईल; ठाकरेंनी सांगितला फॉर्म्युला

मुंबईः लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

लोकमान्य टिळक यांच्याबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, लोकमान्य टिळक हे देशभर पोहोचलेलं नेतृत्व होतं. त्यांचा आवाका इतका कसा वाढला, यावर मी बरेच वर्षे अभ्यास करत होतो. त्यानंतर त्यांचं मोठेपण लक्षात अल्याचं राज यांनी सांगितलं.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

सोशल मीडियाबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, सध्या सोशल मीडिया बोकाळला आहे. कुणीही, कधीही व्यक्त होतं. या व्यक्त होणाऱ्यांवर व्यक्त होण्यासाठी पैसे लावायला पाहिजेत, तरच कुठे हे गप्प बसतील, यांचा नुसता विट आलाय, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्या राज ठाकरे यांची बहुप्रतीक्षित गुढीपाडवा सभा आहे. या सभेमध्ये राज ठाकरे विविध मुद्द्यांना हात घालणार आहेत. सत्तासंघर्ष, मशिदीवरील भोंगे आणि सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण. यावर राज नेमकं काय आणि कसं बोलणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

  • लोकमान्य संपूर्ण देशभर पोहोचले कसे, यावर मी अनेक वर्षे अभ्यास करत होतो.

  • १८९२-१८९३ या वर्षात हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती.

  • हिंदूंचं नेतृत्व त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी केलं होतं.

  • महाराष्ट्रात जे राजकारण सुरुय अशी परिस्थिती कधीच बघितली नाही

  • सोशल मीडियामध्ये कुणीही व्यक्त होतं आहे. व्यक्त व्हायला पैसे लावायला पाहिजेत, तर गप्प होतील.

  • १९९५च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे.

  • राजकारण, समाजकारण बदललं. राजकाराचा ऱ्हास १९९५ नंतर सुरु झाला.

  • नंतर श्रीमंत आणि गरिबीतला दुवा गेला.

  • आज मध्यमवर्ग मुला-मुलींनी राजकारणात येण्याची गरज आहे

  • नाहीतर महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहारसारखी होईल

टॅग्स :Raj Thackeraymns