

Raj Thackeray
esakal
Raj Thackeray Press Conference: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी रोहित पवार सातत्याने बाजू लावून धरत आहेत. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीवर ठपका ठेवल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गेलेल्या रोहित पवारांना रिकाम्या हाती माघारी परतावं लागलं. त्यामुळे त्यांनी गुरुवारी बारामती पोलिस ठाणं गाठलं. तिथंही त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतर शुक्रवारी रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.