
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत जोरदार भाषण दिले. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका, महायुतीला मिळालेले मतदान, पिढीची झालेली चौकशी अशा विविध गोष्टींवर आपले मत मांडले.
याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिस्त लावण्याविषयी देखील राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. पक्षाला शिस्तीची गरज असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी आवर्जून म्हटले.