सभा सुरु असताना आजान सुरु झाली अन् राज ठाकरे संतापले! | Raj Thackeray News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Sabha In Aurangabad

सभा सुरु असताना आजान सुरु झाली अन् राज ठाकरे संतापले!

औरंगाबाद : राज ठाकरे यांची सभा सुरु असताना मध्येच अजान सुरु झाली. यामुळं राज ठाकरे (Raj Thackeray) चांगले संतापले आणि त्यांनी आपलं भाषण थांबवत पोलिसांकडे पाहून त्यांना एक आवाहन केलं. पोलिसांनी त्यांना आत्ताच सांगावं नाहीतर महाराष्ट्राच्या मनगटात किती ताकद आहे हे दाखवू, असं राज ठाकरे म्हणाले. आज रविवारी (ता.एक) औरंगाबाद येथे बहुचर्चित सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते. (Raj Thackeray Sabha News Shut The Loudspeaker Appeal To Police)

पोलिसांना माझी विनंती आहे की, आपण आत्ताच त्यांचं तोंड बंद करावं. त्यांना सांगूनही कळत नसेल तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगू शकत नाही. पोलिसांना परत विनंती हातजोडून सांगतो, आत्ताच त्यांना सांगा. यांना सरळ सांगून कळत नसेल, तर महाराष्ट्राच्या मनगटात काय आहे ते कळेल. भोंगे उतरलेच पाहिजेत. अगोदर मशिदींवरील भोंगे उतरवल्यानंतर सगळ्याच धार्मिकस्थळांवरील भोंगे उतरवा. त्यानंतरही मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.