Bala Nandgaonkar l परवानगी नसली तरी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणारच- बाळ नांगदगावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bala nandgaonkar & raj thackeray

परवानगी नसली तरी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणारच- बाळ नांगदगावकर

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाढव्याला शिवाजी पार्कमध्ये भाषण केलं होतं. या भाषणानंतर राजकीय वर्तुळात अनेक मुद्यांवरून चर्चेला उधानं आले आहे. दरम्यान राज ठाकरे आता येत्या ९ एप्रिलला ठाण्यात सभा घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी या सभेला परवानगी मिळावी, यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. सभेला परवानगी मिळाली नसेली तरी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणारच अशी माहिती बाळ नांगदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या सभेनंतर राजकिय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी सभेसाठी दोन जागांची पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितली. उत्तर सभा हा सभेचा विषय असून, ठाण्यातील विकासाच्या अनुषंगाने बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे ही घरची राजधानी आहे. त्यांचे आवडते ठिकाण आहे. शिवाजी पार्कपेक्षा आक्रमक भाषण ते याठिकाणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी बोलताना ते म्हणाले, आव्हाड हे राज ठाकरें नजरेत खूपच छोटे आहेत. जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देण्यासाठी संदिप देशपांडे, अविनाश आहेत. राज ठाकरेंची गरज नाही. सभा कुठे करायची याबाबत पोलिसांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीविषयी बोलताना नांदगावकर म्हणाले, गडकरी राज ठाकरेंचे जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांची भेट झाली. या भेटीचा माध्यमांनी अर्थ चुकीचा काढला. पण भेट ही भेट असते असेही ते म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत हिंदूत्वाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत विधान केल्यानंतर गृहनिर्माण मंत्नी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टिका केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ एप्रिलच्या नियोजित सभेच्या आयोजनाकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अशातच गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला.

Web Title: Raj Thackeray Speech In Thane Bal Nangdagaonkar Press Conference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..