Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा; राज ठाकरे संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा; राज ठाकरे संतापले

मुंबईः तुम्हाला पक्षाचं काम करायचं नसेल तर पदं सोडा आणि चालते व्हा, असा इशारा राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं

मनसेच्या वतीने आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला निट काम करायचं नसेल तर पदावर काशाला राहाता? पदावरुन दूर व्हा अशा शब्दांत त्यांनी खडसावलं.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचं काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. आगामी काळामध्ये सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करा, लोकांपर्यंत जावून कामं करा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

पुढील महिन्यापासून राज ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत. सुरुवातील ते कोकण विभागाचा दौरा करतील. त्यानंतर ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Raj Thackeraymns