Sharmila Thackeray: ''तुम्ही लहान भावालाही टोमणे मारण्याची संधी सोडत नाहीत'', शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उध्दव ठाकरे यांनी आभार मानल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे
Sharmila Thackeray
Sharmila ThackerayEsakal

राज्यात सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा SIT मार्फत तपास केला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मागे शर्मिला ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही अशा चौकश्यांतून गेलो असल्याचं म्हणत आदित्यची पाठराखण केली. यावर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत.(Latest Marathi News)

उध्दव ठाकरे यांनी आभार मानल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'या विषयी मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला मात्र, तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का?' असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (Marathi Tajya Batmya)

'उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी कधीच दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.(Latest Marathi News)

Sharmila Thackeray
MP Suspended: लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्याचं सत्र सुरूच, महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदार निलंबित

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या?

दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल. चौकश्या तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Sharmila Thackeray
Chhagan Bhujbal News : भुजबळांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! बेनामी संपत्ती संदर्भातील ४ तक्रारी केल्या रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com