
आरत्यासंदर्भात राज ठाकरे यांचा मनसे सैनिकांसाठी नवा आदेश
मशिदींवरील भोंग्यांचा विषय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच उचलून धरला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे चा अल्टीमेटम राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. मात्र, रविवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ४ मे ही नवीन तारीख दिली. याबाबत त्यांनी मनसे सैनिकांना ट्विट करून आदेश दिले आहे. (Raj Thackerays new order for Mansainiks)
मंगळवारी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद आहे. त्यांच्या सनात मला कोणत्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. त्यामुळे ३ मे रोजी भोंग्यांसंदर्भात दिलेली तारीख ४ मे पर्यंत वाढवली. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर ४ मे रोजी काहीही ऐकणार नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) रविवारच्या सभेत म्हणाले होते. यातून त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिले होते.
मात्र, सोमवारी त्यांनी ट्विट करून मनसे सैनिकांना नवा आदेश दिला आहे. ‘उद्या (ता. ३) ईद आहे. रविवारच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.
आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे (tweet) आपल्यासमोर मांडेन.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
हेही वाचा: वीज संकट : अमित शहांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
आता मनसे सैनिक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशाप्रमाणे आरत्या करतात की नाही हेच पाहायचे आहे. रविवारच्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांची परवानगी घेऊन आरत्या करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मनसे सैनिक पोलिसांची परवानगी घेतात की नाही, हेही पाहावे लागणार आहे. राज ठाकरे यांच्या निर्णयाने कोणता तेढ निर्माण होते हेही दिसून येईल.
Web Title: Raj Thackerays New Order For Mns Soldiers Regarding Aartya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..