

Rajasthani Youth Murder in sangli
ESakal
सांगली : सांगलीत कामासाठी आलेल्या राजस्थानी तरुणावर फावड्याच्या दांडक्याने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. गोपालसिंह बेगाराम भदाला (३५, रा. गोविंद पुरा, रिंगर, जि. शिखर, राज्य राजस्थान) असे मृताचे नाव आहे. काल दुपारी हा हल्ला झाला असून, आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र प्रेमकुमार पवनकुमार बराला (रा. जेतुसर, श्री माधवपूर, जि. शिखर, राज्य राजस्थान) याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.