esakal | आषाढी वारीच्या जबाबदारीसाठी राजेंद्र भोसले पंढरीत 
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारीच्या जबाबदारीसाठी राजेंद्र भोसले पंढरीत 

सोलापूर ः उद्या (बुधवारी) आषाढी एकादशी आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीत येत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोजक्‍याच लोकांना पंढरीत सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजेसाठी आज सायंकाळी पंढरीत येत आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर पंढरीच्या वारीची जबाबदारी पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 

आषाढी वारीच्या जबाबदारीसाठी राजेंद्र भोसले पंढरीत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः उद्या (बुधवारी) आषाढी एकादशी आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीत येत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोजक्‍याच लोकांना पंढरीत सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजेसाठी आज सायंकाळी पंढरीत येत आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर पंढरीच्या वारीची जबाबदारी पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना घरी बसून काम करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पंढरीच्या वारीची जबाबदारी कुणावर द्यायची याविषयी चर्चा झाली. श्री. भोसले यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीची वारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तीच जबाबदारी यंदाच्या वर्षीही त्यांच्याकडेच देण्यात आली आहे. श्री. भोसले सोमवारी रात्रीच पंढरीत दाखल झाले आहेत. वारीच्या पार्श्‍वभूमिवर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सायंकाळी पंढरीत येत आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली आहे. श्री. ठाकरे यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा केली जाणार आहे. श्री. भोसले यांना वारीचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.