लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी - आरोग्यमंत्र्यांची माहिती

लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी - आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात सुरु असलेला लॉकडाउन संपणार की आणखी वाढणार? याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत लॉकडाउनसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनबाबत महत्वाचं विधान केलं आहे. लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत राज्यातील लॉकडउनची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 31 मे रोजी राज्यातील लॉकडाउन संपणार आहे.

म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकारकडून उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यामध्ये त्यांनी सद्याच्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचीही माहिती दिली.

लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी - आरोग्यमंत्र्यांची माहिती
18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद- राजेश टोपे

आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे....

  • जनआरोग्य योजनेत म्युकर मायकोसिसचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

  • म्युकरमायकोसिसच्या राज्यातील प्रत्येक रुग्णाची नोंद होणार आहे. राज्यात सध्या 2245 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत.

  • म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

  • म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसीन-बी या औषधाचं रुग्णांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आलं आहे.

  • एक जून पर्यंत एम्फोटेरेसीन-बीच्या 60 हजार लसी उपलब्ध करणार.

  • म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन-बी या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार खाजगी रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

  • 18 जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या जिल्ह्यातील home isolation बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • contact Tracing वाढवण्याच्या सूचना दिल्यात. राज्यात आशा वर्कर्सना कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत लॉडाउनचा निर्णय घेतला जाणार आहे. याबैठकीत नियम आणि अटी ठरवल्या जातील. लॉकडाउन वाढवला जाईल की निर्बंध शिथील करण्यात येणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

  • राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवर

  • राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.5 टक्क्यांपर्यंत घटला आहे.

  • लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला कोणत्याही राज्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्रानं ग्लोबल टेंडर काडून राज्यांना लस द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com