आधीच कोरोना त्यात Mucormycosis चं भय; राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण

mucormycosis
mucormycosisfile photo

कोरोना महामारीनं (coronavirus india) देशभरात हाहा:कार माजवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. राज्यात दररोज 40 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असताना राज्यात आणखी एक संकट आलं आहे. आधीच कोरोनानं हैराण झालेल्या नागरिकांमध्ये Mucormycosis ने भीती वाढवली आहे. राज्यात Mucormycosis चे रुग्ण दिवासागणिक वाढत चालले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील Mucormycosis संकटाची माहिती दिली. राज्यात Mucormycosis चे जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं. (Rajesh Tope: Maharashtra may have over 2,000 cases of Mucormycosis)

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. याआजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफतउपचार करण्यात येणार असल्येचाही टोपे म्हणालेत. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, Mucormycosis ने महाराष्ट्राबरोबरच राज्यस्थान आणि गुजरात राज्यांनाही विळखा घातला आहे. Mucormycosis चे 50 रुग्ण मृत्यू पावतात असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

mucormycosis
कोविड -19 मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 'फंगल इन्फेक्शन' संसर्गाची वाढ

महाराष्ट्रात Mucormycosis चे दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. Mucormycosis च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. Mucormycosis रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, ज्या वेगानं कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच वेगानं Mucormycosis चे रुग्णही वाढत आहेत. राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार, Mucormycosis चं एक लक्षण ब्लॅक फंगल आहे. यामुळे50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतोय. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्याच्या बाजूला सूज, डोकेदुखी, नाकाला सूज, सायनस रक्तसंचय यासारखी लक्षणं आहेत.

mucormycosis
Mucormycosis च्या रूग्णांबद्दल आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

असा पसरतो म्युकोरमायकोसिस

श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.

हे आहेत उपचार

1. डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर ‘अँटीफंगल’ औषधी त्वरित सुरू करावी.

2. ‘अँटी फंगल’ औषोधपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास कान, नाक, डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते.

3. काही रुग्णांत पुढच्या टप्प्यातील या ‘इन्फेक्शन’ मुळे हाडांची झीज झाल्याने व ‘इन्फेक्शन’ नजीकच्या भागात, मेंदू पर्यंत पसरू नये यासाठी शस्त्रक्रिया करून झीज झालेले हाड काढावे लागते त्यात लगतचा अवयव गमवावा लागतो.

4. कोविडपासून मुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com