कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या धोका नाही: राजेश टोपे

rajesh tope
rajesh toperajesh tope

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची (Corona Infection) राज्यातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, या संदर्भात नीती आयोगाने (Niti Ayog) दिलेला अहवाल जून महिन्यातील आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सोमवारी (ता. २३) केले.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या (Aurangabad) सिल्कमिल कॉलनी येथील आरोग्य केंद्रातील डिजिटल एक्स-रे मशीनचे सोमवारी टोपे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, कोरोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल. त्यात एका दिवसात पाच ते सहा लाख जणांना कोरोनाची बाधा होऊ शकते, असे सूतोवाच नीती आयोगाच्या अहवालात होते. पण हा अहवाल जून महिन्यातील आहे. नव्याने कुठलाही अहवाल आलेला नाही. परंतु या अहवालानंतर राज्य शासनाने (Maharashtra) संपूर्ण तयारी केली केली आहे. ऑक्सिजन, औषधी खरेदी, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

rajesh tope
World Vadapav Day 2021 : मुंबई वडापाव बनवा घरी, ही आहे रेसिपी

खर्चासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली आहे. त्यामुळे राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज असून राज्याने एकाच दिवसात साडेदहा लाख लोकांच्या लसीकरणाचा विक्रम केला आहे. आम्ही पंधरा लाखापर्यंत दररोज लसीकरण करण्याची तयारी केली आहे. परंतु केंद्राकडून लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने या कामाला ब्रेक लागत असल्याचेही टोपे म्हणाले.

फडणवीसांकडे वेळ नसावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मुबलक प्रमाणात राज्याला लस मिळवून देण्यासाठी सोबत दिल्लीला येण्याचे आश्वासन दिले होते. माझे फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. पण सध्या ते व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा. पण आम्ही मुबलक लस साठा मिळावा यासाठी त्यांची मदत निश्चित घेणार आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

rajesh tope
गावाच्या शिवारात येताच पत्नीचा दुचाकीवरुन पडून मृत्यू

राजकीय पक्षांनी जबाबादारी पाळावी

राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्यावर सरकार काही कारवाई करणार का, यावर टोपे म्हणाले, कोरोनाचा धोका कायम असल्याचे सरकारने स्पष्ट करून अशावेळी घ्यावयाची काळजी, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ या बाबतची नियमावली जाहीर केली आहे. ती पाळण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची आहे, तशीच ती राजकीय पक्षांचीही आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. कारवाई संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील.

आरोग्य कर्मचारी भरती लवकरच

लवकरच राज्यात आरोग्य कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी औषधी व लसीकरण चे नियोजन सुरू आहे, यामुळे नागरिकांना काळजी करण्याचे कारण नाही, असे टोपे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com