Rajkot Fort: 'राजकोट'वरील शिवरायांच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियन कंपनीकडून चाचणी; पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे
नव्याने साकारण्यात येत असलेला शिव पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. त्याची दहा वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. स्वतंत्र गुणवत्ता चाचणी पथकाकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्याचे काम करण्यात येत आहे.
मालवणः शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पुतळा २०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल, असा बनविला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी केली आहे.