
NCP News: तुम्ही राजू ला लाखाच्यावर मताधिक्य द्या मंत्रीमंडळात सन्मानाचे पद देण्याची जबाबदारी माझी असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वसमत येथील जाहीर सभेत उपस्थित हजारो लाडक्या बहिणींना दिले होते.
विशेष उपस्थिती शेकडो महिलांनी दादांना राखी बांधून ओवाळणीत मंत्रीपद मागीतले होते. परंतू मंत्रीमंडळाच्या विस्तारात आमदार राजू नवघरे यांची वर्णी न लागल्याने लाडक्या बहिणी नाराज झाल्याचे चित्र वसमत विधानसभा मतदारसंघात होते.