कोल्हापुरात राजू शेट्टी कडाडले..., घोटाळा बाहेर काढणार

मंत्रालयात सापडू लागल्या दारूच्या बाटल्या- राजू शेट्टी
Raju shetti
Raju shettiesakal

कोल्हापूर: माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला तर नुकसान भरपाई २५ कोटीची वसुली शेतकऱ्याकडून केली जाते. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून मृत्युमुखी झाला तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. या तीन कुबड्याच्या सरकारने शेतकऱ्याला अस्थिर केले आहे. राज्यात धरणे बांधली गेली, जमिनी शेतकऱ्याच्या घेतल्या गेल्या. पुर्नवसन देखील शेतकऱ्याच्या जमिनीवर केला गेला. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. मस्तीत व सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला इशारा दिला.

Summary

शेतकऱ्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू.

शेतीला सलग १० तास दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मंत्रालयाच्या दालनांची वीज अहोरात्र सुरू असते. मंत्रालयात देखील दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. तिथेही हेच धंदे सुरू असतात काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंत्र्याची दालने दिवसाही विजेने चमकत असतात. सरकारच्या तिजोरीतून पैसा उचलून विजेची बिले भागवली जातात. अन्नदात्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून नागवले जात आहे असे ही ते म्हणाले.

महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू. राज्यातील जनतेला लुबाडायचे व त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

Raju shetti
उदयनराजे उद्या मोठी घोषणा करणार! ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

यावेळी प्रा. जालंधर पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सागर कोंडेकर, सचिन शिंदे, विक्रम पाटील, सागर संभूशेटे, शैलेश आडके, अजित पवार, राम शिंदे .पोपट मोरे , शमसुद्दीन सनदे , डाॅ. बाळासाहेब पाटील , विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येेने उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com