Raju Shetti : 'राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार लुच्चे, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला.
Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti
Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shettiesakal
Summary

शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोला शेट्टी यांनी लगावला.

नेर्ले : आजचे सरकार लुच्चे, फसविणारे असून आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. शोषणमुक्त शेतकरी करण्यासाठी तुम्ही मला साथ द्या, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.

पंतप्रधान मोदी, शिंदे, अजित पवार व फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचा खूप ध्यास लागला असून शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी लगावला.

Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti
CM Eknath Shinde News: 'अजितदादांची चिंता करू नका, या एकनाथ शिंदेच्या मागं 220 आमदारांचं पाठबळ आहे'

ते (Raju Shetti) नेर्ले (ता. वाळवा) येथील विलासराव मल्टिपर्पज हॉलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानां’तर्गत आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक ए. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शक रावसाहेब पाटील, स्वाभिमानीचे तानाजी साठे, अशोक बल्लाळ, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते एस. यू. संदे, भागवत जाधव, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, एकनाथ निकम, हणमंत कुंभार, शिवाजी पाटील, जगन्नाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti
Raj Thackeray : आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा; मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने शेतकरी जनजागृती अभियानाला सुरवात केली आहे. शंभर रुपयांची एफआरपी वाढवून मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु ऊस शेतीसाठी प्रत्यक्ष खर्च सोडला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही.’’

Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti
Ramdas Athawale : 'वाटेल ते झालं तरी चालेल, मात्र मोदी सरकारला बाबासाहेबांचं संविधान बदलू देणार नाही'

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला. बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतकऱ्यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे.

तलाठी, तहसीलदार, प्रशासन अधिकारी तुमच्या पैशातून पगार घेतात, तरीसुद्धा चिरीमिरीसाठी हात पसरतात. विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा या तुमच्याच पैशातून होत आहे. मंत्री ठेकेदाराकडून दहा ते पंधरा टक्के घेतात आणि विकास कामे आम्हीच केली, असे छाती बडवून सांगतात. तेलंगणामधील बी. आर. एस.चे मंत्रिमंडळ पंढरपूर मध्ये आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आले होते का?

Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti
Good News : आता घरातील प्रमुख महिलेला मिळणार महिन्याला दोन हजार रुपये; गृहलक्ष्मी योजनेची 'या' तारखेपासून सुरुवात

शेट्टींची सावध भूमिका

आजच्या राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राजू शेट्टी म्हणाले, आताच्या राजकारणाचा दर्जा घसरला असून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडली नाही. स्वतःचे हित साधले जात आहे. तुम्ही कुणाला सोबत घेऊन लढणार का, या प्रश्नावर, मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही. स्वाभिमानी पक्षातूनच मी लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com