esakal | शासनाच्या प्रस्तावावर विचार करुन पुढचा निर्णय घेऊ- राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

शासनाच्या प्रस्तावावर विचार करुन पुढचा निर्णय घेऊ- राजू शेट्टी

sakal_logo
By
सुधीर काकडे

पुरग्रस्त लोकांना मदक मिळावी ही मागणी घेऊन मागच्या चार दिवसांपासुन शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची पदयात्रा सुरु आहे. पोलिस प्रशासनाने आम्हाला एकत्र येण्याची परवानगी दिलेली आहे. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर नदीत उड्या टाकू असे असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच शासनाचा प्रस्ताव येणार असून हा प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करुन पुढचा निर्णय घेऊ अशी भुमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

नृसिंहवाडीमध्ये हे आंदोलन सुरु असताना एका कार्यंकर्त्यांने नदीत उडी घेतली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी नदीत बोटी तैनात ठेवल्या असल्याने लगेचच या कार्यकर्त्याला बाहेर काढण्यात आले. राजू शेट्टी यांनी या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच जर जलसमाधी घ्यायची असेल, तर पहिली उडी माझी असेल. इचलकरंजीचे प्रांत अधिकारी खरात हे शासनातर्फे आम्हाला प्रस्ताव देणार असून या प्रस्तावावर विचार करुन पुढची भुमिका घेऊ अशी माहिती राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रयाग चिखली येथून गेली पाच दिवस पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी पदयात्रा सुरू आहे. यामध्ये शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत. शासन भूमिकेच्या विरोधात घोषणा देत आज ठीक 4 वाजता कुरुंदवाड येथे राजू शेट्टींच्या शेतकरी बांधवांचे आगमन झाले. तत्पूर्वी कुरुंदवाड यादव पुलाच्या बाजूने सायंकाळी ठिक सव्वाचार वाजता पंचगंगा नदीपात्रात शिरढोण येथील 45 वर्षीय शेतकऱ्यानं थेट उडी टाकली.

loading image
go to top