सांगली : ‘शक्तिपीठ महामार्ग’ हाच एक गैरव्यवहार आहे. या टप्प्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि मूठभर ठेकेदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. ते आम्ही होऊ देणार नाही ’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.