...तर मुनगंटीवारांना मी हार घालेन - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan vs Sudhir Mungantiwar
Prithviraj Chavan vs Sudhir Mungantiwaresakal
Summary

छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीत उभं राहणार नसल्याची घोषणा केलीय.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यसभा निवडणुकीत उभं राहणार नसल्याची घोषणा केलीय. राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. यानंतर भाजपनं महाविकास आघाडीसह शिवसेनेवर निशाणा साधायला सुरुवात केलीय. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

Prithviraj Chavan vs Sudhir Mungantiwar
बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेला अपक्ष पाठिंबा देण्याचा प्रश्न हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक आहे. महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या भाजपनं, (BJP) तसेच सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वतः च्या पक्षाच्या कोट्यातून अपक्ष म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिलं तर स्वागत करेन. एवढंच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांना हार घालेन, असं विधान चव्हाण यांनी केलंय. कऱ्हाड (Karad) इथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत काॅंग्रेसची (Congress) भूमिका स्पष्ट केलीय.

Prithviraj Chavan vs Sudhir Mungantiwar
राजं तुमच्यासाठी कायपण! राज्यसभेसाठी छत्रपती संभाजीराजेंना MIM आमदाराचा पाठिंबा

संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) टार्गेट केलंय. तेव्हा महाविकास आघाडी सरकारचा प्रश्न नसून हा प्रत्येक पक्षाचा वेगळा असल्याचं यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केलं. आमदार चव्हाण म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा काहीही संबध नाही, वैयक्तिक प्रश्न आहे. राज्यसभेला 6 जागा आहेत. काॅंग्रेसच्या वाट्याला आलेली जागा आता जाहीर होईल. शिवसेना (Shiv Sena) पक्षाला 2 जागा असून त्याचा निर्णय पक्ष घेईल. राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा आहे. तेव्हा हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही. प्रत्येक पक्ष आपण कुणाला तिकीट द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं संभाजीराजेंचा अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय आहे, तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा द्यावा, असं त्यांनी आवाहन केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com