
Navneet Rana Case : गैरवर्तनाचे सत्र रात्रभर चालू होते का? राम कदमांचा सवाल
मुंबई : नवनीत राणा (Navneet Rana Case) यांना तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचा आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. त्यारूनच आता भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी मुंबई पोलिस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि ठाकरे सरकारला काही सवाल विचारले आहेत. राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ जारी केला त्याप्रमाणे रात्री साडेअकरा नंतर तुरुंगात काय घडलं? त्याचे व्हिडिओ देखील जारी करावेत, असं राम कदम म्हणाले.
हेही वाचा: नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?
नवनीत राणांना सांताक्रुझ पोलिस ठाण्यात नेल्यानंतर रात्री साडेअकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांना वाईट वागणूक देण्यात आली का? याचा व्हिडिओ मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी करावा. त्यांचा छळ करण्यात आला का? त्यांना पाणी सुद्धा प्यायला दिले नाही. इतकेच नाहीतर गरजेच्या वस्तू देखील त्यांना पुरवल्या नाहीत. त्यांना प्रसाधनगृहात जाण्यापासून देखील रोखण्यात आले. अमानवयीन पद्धतीची वागणूक त्यांना देण्यात आली, असे गंभीर आरोप राम कदम यांनी केले आहे.
सांताक्रूझ पोलिसांत हे गैरवर्तनाचे सत्र रात्रभर चालू होते का? मुंबईचे पोलिस आयुक्त तो व्हिडिओ कधी प्रसारीत करणार? त्यांच्यावर अशी कोणती सक्ती आहे, की ते फक्त अर्धा व्हिडिओ जारी करतात. सरकार अर्धसत्य दाखवून आपला कलंकीत चेहरा लपवत आहे का? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला. तसेच व्हिडिओ जारी करण्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिणार असल्याचे कदम म्हणाले.
नवनीत राणांना तुरुंगात वाईट वागणूक दिली असून त्यांना जमिनीवर झोपायला लावले. त्यामुळे त्यांच्या कंबरेचे दुखणे वाढले. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. तसेच याबाबत वकिलाने कोर्टात देखील माहिती दिली होती.
Web Title: Ram Kadam Asked Maharashtra Government Released Video Of Navneet Rana Custody
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..