सरकारने कितीही रोखले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणार - राम कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram-kadam

सरकारने कितीही रोखले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणार - राम कदम

मुंबई : बार उघडताना कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) आडवी येत नाही. दारूचे अड्डे उघडताना तिसरी लाट आडवी येत नाही. दारूची दुकाने कोरोना फ्रूफ आहेत का? मात्र, हिंदूची मंदिरे उघडताना यांना तिसरी लाट आडवी येते. दहीहंडी उत्सवाला (Dahi Handi celebration 2021) परवानगी देताना मात्र तिसरी लाट आडवी येते, अशी टीका भाजपचे नेते राम कदम (bjp leader ram kadam) यांनी केली आहे. काहीही झाले तरी आम्ही घाटकोपरमध्ये श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करणार. सरकारने कितीही रोखले तरी सण साजरा होणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही

रिक्षावाल्यांना म्हणायचे तुम्हाला १५०० रुपये म्हणतील. मात्र, ते पैसे कोणालाच मिळाले नाही. हे सरकार फसव्या घोषणा करतंय. फसव्या घोषणा करणारे सरकार आहे. लोकांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? हे एसीमध्ये बसून आम्हाला सांगण्याची गरज नाही. गेल्या दोन वर्षांत तुम्ही जनतेची काय काळजी घेतली हे जनता विसरली नाही. उत्सव साजरा करताना कशी काळजी घ्यायची आम्हाला माहिती आहे. कोरोनामुळे लोक तडफडून मेले. तुम्ही फक्त घोषणा केल्या. त्यांना काय दिले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आजची दहीहंडीसंदर्भातील बैठक फक्त डोळ्यात धुळफेक करणारी होती. सर्व गोविंदा पथकांनी लसीकरणाची अट ठेवून उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली. मात्र, या सरकारने ती नाकारली. दारूच्या दुकानांना तुम्ही नियम लावू शकता, तर हिंदूंच्या सणांसाठी नियम का लावू शकत नाही. आम्ही सर्व धर्माचा सन्मान करतो. पण, हिंदूत्व आमचा आत्मा आहे. तीन फुटाचं नाही, सहा फुटांचं अंतर ठेवायाला सांगा. आम्ही सरकारच्या सर्व नियमांचं स्वागत करू. पण, प्रत्येकवेळी संयमांची सबुरीची भाषा हिंदूंनाच का सांगायची? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.

गोविंदा पथकामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांची देखील महाराष्ट्र सरकारने फसवणूक केली आहे. हे हिंदूविरोधी सरकार आहे. याच सरकारमुळे मुंबईतील हजारो लोकांचा नोकऱ्या गेल्या आहेत. यांनी वेळेवर लोकल सुरू केली नाही, असा आरोप देखील कदम यांनी यावेळी केला.

Web Title: Ram Kadam Criticized Mahavikas Aghadi Government On Shrikrishna Janmashtami Celebration 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ram Kadam