रामदास आठवले यांनी सांगितले पवारांना भेटण्यामागचे कारण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शरद पवारांच्या निवासस्थानी आठवलेंनी भेट घेतली. सत्तासंघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती रामदास आठवलेंनी मिडीयाशी बाेलताना दिली.

मुंबई ः सध्याच्य़ा राजकीय स्थितीबाबत चर्चा कऱण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर आोक निवास्थानी आज भेट घेतली व सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा केली. त्यानंतर आठवले यांनी मिडीयाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासेबत शरद पवार देखील होते. भर पावसात आठवले शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

दरम्यान, सिल्व्हर ओक’मधील शरद पवारांच्या निवासस्थानी आठवलेंनी भेट घेतली. सत्तासंघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती रामदास आठवलेंनी मिडीयाशी बाेलताना दिली. तर सेना-भाजपात मध्यस्थी करा, असा सल्ला पवारांनी आठवलेंना दिला.

गडकरींची डिप्लोमसी सोडवणार सेना भाजपतील सत्तास्थापनेचा तिढा ?

महायुतीचा भाग असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे सर्वेसर्वा रामदास आठवलेंनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीसोबत असलेले आठवले नंतर मात्र महायुतीच्या गोटात सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 14 ते 15 दिवस होऊन देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. राज्यात सेना-भाजपच्या भूमिकेमुळे सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. तसेच तो पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या बाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलो असल्याचे आठवले यांनी सांगितले. स्थितीबाबत आठवले यांनी भूमिका घेऊन सेना-भाजपला सल्ला द्यावा असे सांगितल्याचे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शिवसेना आमदारांना आता 'इथे' ठेवलं जाणार..

दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 50-50 फॉर्म्युलावरुन दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा सत्तास्थापनेचा खेळ कधी थांबणार, याकडे सर्वसामान्यांतचे लक्ष लागले आहे.

सकाळपासून काय घडले?
काँग्रेस नेत्यांचा भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप
शिवसेना आमदाराला भाजपची ऑफर : विजय वडेट्टीवार
मुंबईतून मध्यस्थीचा प्रयत्न झाल्याचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांचा गौप्यस्फोट
शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम; संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका केली स्पष्ट 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल, भाजप नेत्यांशी चर्चा
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हा प्रमुखांशी चर्चा 
50-50 टक्के फॉर्म्युल्याची कोणतीही चर्चा नाही : नितीन गडकरी

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdas athawale meets sharad pawar at silver oak