
कोल्हापूरः ‘‘रिपब्लिकन पक्षामध्ये विविध गट आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल; कारण समाजापेक्षा पद मोठे नाही,’’ असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले.