आठवले म्हणतात,भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची काय आवश्यकता?

 Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal media

कल्याण : केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी म्हटलंय की, भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे महायुतीचे सरकार पुन्हा येऊ शकते. एकत्र बसून यावर चर्चा होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची काय आवश्यकता आहे? ते कल्याण पूर्वेत ज्येष्ठ समाजसेवक देवचंद आंबादे याच्या वाढिवसानिमित्त आले होते.

 Ramdas Athawale
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्त्वाचे मुद्दे

पुढे त्यांनी म्हटलंय की, एवढी वर्षे सत्तेमध्ये असूनही काँग्रेसला जातीवाद संपवता आला नाहीये. राज ठाकरे यांनी परवा जे पुण्यात वक्तव्य केलंय की राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीयवाद वाढला, त्याबद्दल ते म्हणाले की, दलितांवर अत्याचार झाला तर तो राष्ट्वादी कडून होत आहे, याची माहिती त्यांना मिळाली असेल म्हणून त्यांनी तसा आरोप केला असेल. पुढे ते म्हणाले की, मनसे आणि भाजपची युती होणे अश्यक्य आहे. कारण भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची आवश्यकता नाही. तसेच येणाऱ्या मुबंई महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय जिंकेल. त्यामुळे मनसेची आवश्यकता नाहीये. येणाऱ्या केडीएमसी पालिका निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत राहील, असंही त्यांनी म्हटलंय.

 Ramdas Athawale
केरळवर नवं संकट; पोस्ट-कोविड कॉम्पलीकेशनमुळे 4 मुलांचा मृत्यू

2024 ला देशात भाजप-रिपब्लिकन पक्षाचं सरकार

याआधी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठं भाकित केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली असेल. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री रहावा, उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे या पध्दतीची चर्चाही झाली असेल. शिवसेना व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग होत असेल, तर त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. दरम्यान, मोदींविरोधात कोणी कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवू शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असे भाकित त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com