शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं- रामदास कदम

Ramdas Kadam
Ramdas Kadam esakal

गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.(ramdas kadam slams sharad pawar shivsena uddhav thackeray)

52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले.

यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला. मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं"

अजित पवार सकाळी ७ वाजल्यापासून मंत्रलायत बसत्यात. १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडणुर कसे आणायचे याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे. आणि शिवसेनाचा आमदार कसा संपवायचा हे कटकारस्थान मागच्या अडीच वर्षापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी केलं होत आणि ते जवळ जवळ यशस्वी झाले. मी याचा पूर्व अभ्यास केला.

उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा शरद पवारांनी कोकणात पक्ष फोडण्याचे काम केलं त्याचे पुरावे दाखवले होते पण उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं असा आरोप कदम यांनी यावेळी केला.

बाळासाहेबांनी पवारांसोबत उद्धव यांना जाऊ दिलं असत का? पक्षापेक्षा उद्धव ठाकरेंनी शरद पवार मोठे वाटतात का? असे सवाल उपस्थित करत शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं असा आरोप रामदार कदम यांनी केला.

तसेच, हे सरकार पाच वर्ष चालल असत तर शिवसेना संपली असती. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला. असा आरोप कदम यांनी केला

पुष्कळ विचार केल्यानंतर सेना सोडण्याचा निर्णय घेतला. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी ६ महिने वेळ दिला नाही आणि आता सभा घेत आहेत. अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com