छत्तीसचा आकडा असणाऱया रामराजेंनी उदयनराजेंना का दिल्या शुभेच्छा...

सागर आव्हाड 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सामशी बाेलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील छत्तीसचा आकडा असणारे आपले सहकारी सध्या भाजपच्या वाटेवर असलेले उदयनराजे भाेसले यांना शुभेच्छा दिल्या. 

फलटण (सातारा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याअगाेदर सामशी बाेलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील छत्तीसचा आकडा असणारे आपले सहकारी सध्या भाजपच्या वाटेवर असलेले उदयनराजे यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी बाेलताना ते म्हणाले, कार्यकर्ते जो निर्णय घेतील ताे मला मान्य असेल. आज हाेणारा हा मेळावा कार्यकर्त्यांचा आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, सध्या पक्षांतराबाबत ज्या बातम्या येत आहेत, त्या बातम्यांमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, त्यासाठी हा मेळावा आहे.

पुढे ते म्हणाले, निवडणूक जवळ आली की असे मेळावे होतात.  राजकीय परस्थिती बदलत आहे, उदयनराजेंबद्दल बोलायची माझी लायकी नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणत्या पक्षात जायचे भाजप की शिवसेना असा पेच निंबाळकर यांच्या पुढे आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या आज होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या दोन्ही नेत्यांचे कधीही पटले नाही. मात्र रामराजे निंबाळकर यांनी आता उदयनराजे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रामराजे बाेलताना पुढे म्हणाले, ते काहीही करू शकतात, ते आबाउट पार्टी पाॅलिटीशियन आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramraje Nimbalkar well wisesh to Udayanraje Bhosale