Apmc Election Result: मतभेद विसरून काँग्रेस-शिंदे गटाचे आमदार आले एकत्र, पण तरीही सुपडा साफ

Sunil Kedar and Ashish Jaiswal
Sunil Kedar and Ashish Jaiswal

नागपूर : जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत माजी मंत्री, आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी सर्व मतभेद विसरून रामटेकचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्याशी युती केली होती. मात्र तरीही त्यांना रामटेक बाजार समिती आपल्याकडे राखता आलेली नाही.

Sunil Kedar and Ashish Jaiswal
Raju Shetti : आगीशी खेळू नये, तुमची तशी परिस्थितीही नाही...; बारसूवरून शेट्टींचा CM शिंदेंना सल्ला

नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणावर अनेक वर्षांपासून दबदबा ठेवून असलेले सुनील केदार यांना त्यांचे जवळचेच कार्यकर्ते सोडून गेल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी सुरूवातीलच अवघड झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी केदार यांनी शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांची मदत घेतली. पण एकेकाळी केदारांचे कट्टर समर्थक असलेल्या सचिन किरपान व मिन्नू गुप्ता या कार्यकर्त्यांनीच त्यांना पराभवाची धूळ चाखायला लावली.

किरपान व गुप्ता यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी सहकार पॅनेल मैदानात उतरवले. त्यामुळे आमदार केदारांना ऐनवेळी आमदार जयस्वाल यांच्याशी सर्व प्रकारचे राजकीय मतभेद विसरून युती करावी लागली.

Sunil Kedar and Ashish Jaiswal
उद्धव ठाकरेंच्या आजारपणात आदित्य यांनी CMपदासाठी षडयंत्र रचलं पण...; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

दुसरीकडे या निवडणुकीत भाजपचे नेते डी. एम. रेड्डी यांनीही उडी घेतली होती. त्यांनी या निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसचे गज्जू ऊर्फ उदयसिंह यादव यांच्याशी युती केली होती. त्यांना तरी चार जागांवर विजय मिळवता आला. पण केदार-जयस्वाल गट येथे खातेही उघडू शकले नाही.

सचिन किरपान यांनी केदारांच्या विरोधात शेतकरी सहकार पॅनल उभे केले होते. त्यांनी एकूण १४ जागांवर विजय मिळवला. त्यांपैकी सेवा सहकारी सोसायटीतील सर्व ११ जागा जिंकल्या. व्यापारी अडते गटातून दोन, तर हमाल मापारी गटातून एक जागा, अशा एकूण १४ जागांवर त्यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपने शेतकरी विकास पॅनल उभे केले होते. त्यांना ग्रामपंचायत गटातील चार जागांवर विजय मिळवता आला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com