रणजीत सावरकरांचं अस्तित्वच खोट्या प्रचारावर टिकून - तुषार गांधी : Savarkar Vs Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tushar Gandhi_Ranjeet Savarkar

Savarkar Vs Gandhi : रणजीत सावरकरांचं अस्तित्वच खोट्या प्रचारावर टिकून - तुषार गांधी

शेगाव : भारत जोडो यात्रेनिमित्त इतिहासातील दोन बड्या नेत्यांच्या वारसांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या विधानावरुन सावरकारांचे पणतू रणजीत सावरकर यांनी निषेध व्यक्त केला. यावरुन तुषार गांधी यांनी रणजीत सावरकर यांच्यावर टीका केलीए, त्यांचं अस्तित्वच खोट्या प्रचारावर टिकून आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Ranjit Savarkar existence is based on false propaganda says Tushar Gandhi)

हेही वाचा: Savarkar issue and MVA : सावरकरांच्या मुद्द्यावरुन 'मविआ'त फूट पडणार का? जयराम रमेश यांनी स्पष्टच सांगितलं

शेगाव इथं भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले असताना तुषार गांधी बोलत होते. रणजीत सावरकरांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला असून त्यांची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तुषार गांधी म्हणाले, "खरंतर भारत जोडो यात्रेची विरोधकांना भीती वाटतेय त्यामुळं त्यांचा हा सगळा प्रयत्न सुरु आहे. रणजीत सावरकर यांचं मी समजू शकतो कारण त्याचं अस्तित्वच त्यावर टिकून आहे. खोट्याचा प्रचार करुन प्रतिभा वाढवायचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना ते करावी लागतं"

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

हेही वाचा: MNS Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंना रोखलं! मनसे आक्रमक

जे सत्य आहे ते आपण सांगण हे गरजेचं आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे की सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून तुरुंगातून सुटका करुन घेतली होती. इतकंच नाही तर आपल्यासाठी पेन्शनही घेतली होती. त्यानंतर इंग्रजांशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले. इंग्रज सरकारसाठी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात स्वतः आदेश देऊन शिपाई भरती केली होती. याचे पुरावे आहेत त्यामुळं यावर कोणी खोटं बोलत नाही. ज्यांना याची भीती वाटते ते रस्त्यावर येतात. पण सत्य कमजोर नसतं त्यात ताकद असते ते स्वतःच्या जोरावर उभं राहू शकतं. ज्यांच्याकडे काहीही मुद्दे नाहीत ते सर्वजण आंदोलनं करत आहेत. यात मला काही विशेष वाटत नाही, असंही तुषार गांधी यावेळी म्हणाले.