LokSabha 2019 : रणजित सिंह मोहीते पाटील आणि गिरीश महाजनांच्या भेटीने राजकिय चर्चांना उधान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 मार्च 2019

मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. 

मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. 

रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्‍न मुंबईतील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मंत्री असून, भाजपमध्ये महाजन यांना मानाचे स्थान आहे. राज्य सरकारचे संकटमोचक म्हणून ते ओळखले जातात. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे सर्व सोपस्कार महाजन यांनीच पार पाडले. त्याच महाजन यांच्या शिवनेरी या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रणजितसिंह यांनी आज सकाळी जाहीरपणे भेट घेतली. रणजितसिंह यांचे पिता विजयसिंह मोहिते-पाटील हे माढामधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, तेथून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पक्षाने तयारी करण्यास सांगितले होते.

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच माढामधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार कुटुंबीयातील घडामोडीने पवार यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. मग, राष्ट्रवादीचा माढ्यातील उमेदवार कोण असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ मोहिते-पाटील कुटुंबीयांकडून बांधली जात आहे. आम्हाला डावलल्यास आमच्यासमोर पर्याय आहे, असा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी रणजितसिंह यांनी महाजन यांची भेट घेतल्याचे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjit Sinha mohite Patil and Girish Mahajan meting