
जालना : वीज निर्मितीचा (Power Generation) दर आटोक्यात ठेवायचा असेल तर तर महानिर्मिती कंपनीचा (Mahanirmiti Company) अनावश्यक खर्च कमी करा, केंद्राच्या कंपनीकडून मिळणाऱ्या कोळसा दरावर खापर फोडू नका, असा सल्ला केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Of State For Railway, Coal Raosaheb Danve) यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत (Power Minister Nitin Raut) यांना दिला आहे. केंद्र सरकारची कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लि.चा कोळसा वीस टक्के जादा दराने मिळत असल्याने महानिर्मितीची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला होता. त्यावर दानवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, डॉ. राऊत यांनी संपूर्ण अभ्यास केलेला नाही. मूळात महाराष्ट्राची (Maharashtra) एकूण वीज मागणी २५ हजार मेगावॅट आहे. त्यात महानिर्मितीचा वाटा फक्त ६ हजार ५०० मेगावॅटचा आहे. केंद्राच्या वेस्टर्न कोलफिल्ड्ससह इतरांकडूनही महानिर्मितीतर्फे कोळसा घेतला जातो.(raosaheb danve advise to nitin raut, cut unneccessary expenditure for mahanirmiti jalna glp88)
वेस्टर्न कोलफिल्ड्सकडून घेतलेल्या कोळशावर २५ हजार मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकत नाही तर केवळ तीन हजार मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. इतर कंपन्यांच्या तुलनेत वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या कोळशाची किंमत नेहमीच जास्त असते, हे सर्वश्रुत आहे. कोळशाची गुणवत्ता आणि खाण कार्यासाठी येणाऱ्या खर्चावर दर अवलंबून असतो. खरेदी करार करताना महानिर्मिती आणि कंपनीला या गोष्टी माहीत असतात आणि त्याचप्रमाणे दर ठरतो. ही पद्धती अनेक वर्षांपासून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातही अशीच पद्धत होती. मात्र अशा प्रकारचा युक्तिवाद कधीही कोणी केला नव्हता. त्यामुळे कमी खर्चात वीज कुठे उपलब्ध आहे, हे पाहून ती खरेदी करा, अपारंपरिक उर्जेला प्राधान्य द्या, वीज चोरी थांबवा, गळती कमी करा, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.