EDची कारवाई आताच होते का, रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला

'महाराष्ट्राचा अपमान महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी केला.'
Raosaheb Danve And Sanjay Raut
Raosaheb Danve And Sanjay Rautesakal

ईडीची कारवाई आताच होते का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचे काय कारण आहे, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सक्तवसुली संचालनालयासह (ईडी) इतर केंद्रीय संस्थांकडून बेकायदेशीर चौकशी केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या संस्थांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लालूप्रसाद यादव, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, तर सुरेश कलमाडी हे तुरुंगात गेले तेव्हा कुणाचे सरकार होते? महाराष्ट्राचा अपमान महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन पक्षांनी केला.(Raosaheb Danve Criticize On Sanjay Raut Letter To Vice President Of India)

Raosaheb Danve And Sanjay Raut
सिगारेटने जाळला चेहरा, अवघ्या १० वर्षांच्या मुलाबरोबर क्रूर वर्तन

भारतीय जनता पक्षाला (BJP) जनतेने जनादेश दिला होता. त्यांना विरोधी बाकावर बसवलं होते. जनादेशाविरोधात तुम्हा वागला. त्याने अपमान झाला, असे म्हणत दानवे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना वाढल्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवू आणि सरकार स्थापन करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या बरोबर होतात म्हणून इथ पर्यंत पोहोचलात. लोकसभा आणि विधानसभेत आमच्या बरोबर नसता तर काय स्थिती झाली असती, अशा शब्दांत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com