
छत्रपती संभाजीनगर : ‘‘पक्षाने मला खूप काही दिले आहे, दोन मुले आमदार आहेत. राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जाण्याचा माझा विचार नाही. पण पक्षाने संधी दिली तर २०२९ ची लोकसभेची निवडणूक लढणार आहे,’’ असे सूतोवाच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शनिवारी केले.