दाजींचा नादच खुळा! वाघ्या-मुरळीच्या गोंधळात दानवेंनी वाजवला तुणतुणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत राहणारं व्यक्तीमत्व आहे.

दाजींचा नादच खुळा! वाघ्या-मुरळीच्या गोंधळात दानवेंनी वाजवला तुणतुणा

राजूर (जालना) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमी चर्चेत राहणारं व्यक्तीमत्व आहे. आपल्या निरनिराळ्या कारनाम्यांनी ते नेहमीच लोकांचं लक्ष आपल्याकडं केंद्रित करून घेतात. बुलेट, घोडा सवारी, ट्रॅक्टर, बैलगाडी हाकणे, म्हशीचे दूध काढणे ते चुलीवर भाजी-भाकरी करतांनाची त्यांची अनेक रुपं आतापर्यंत समोर आली आहेत. आता रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी स्वतः हातात तुणतुणे घेऊन जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जोशपूर्ण सहभाग घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ भोकरदन तालुक्यातील (Bhokardan Taluka) खामखेडा (Khamkheda) येथील रविवारी झालेल्या कार्यक्रमातील आहे.

सोशल मीडियावर (Social Media) तर याची चर्चा सुरूच आहे, पण तुणतुणे वाजवतानाच्या दानवे यांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खसखस पिकतांना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांचा अस्सल मराठी बाणा सर्वत्र परिचित आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा किंवा खासदारकीचा बडेजाव न दाखवता सर्वसामान्यांत मिसळून होणे हा त्यांचा स्वभाव. याची प्रचिती पुन्हा एकदा रविवारी माजी उपसभापती गजानन नागवे यांनी आयोजित केलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात आली. रात्री साडेदहा वाजता मंत्री दानवे यांची या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. कोरोनानंतर (Coronavirus) होणाऱ्या अस्सल मराठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम पाहून मंत्री दानवे सुद्धा मोठ्या उत्साहानं यात सहभागी झाले होते.

हेही वाचा: अभिनेत्री प्राजक्ता माळीला मिळाला राज्यपालांच्या हस्ते मानाचा पुरस्कार

वाघ्या-मुरळींचा गोंधळ रंगात आला होता, वाघ्या तुणतुण वाजवून गोंधळात रंगत आणत असताना अचानक रावसाहेब दानवेंनी त्याचे तुणतुणे हाती घेतले. बराचवेळ दानवेंनी तुणतुणे वाजवत जागरण-गोंधळात साथसंगत केली. यळकोट यळकोट, जय मल्हार या गाण्यावर ताल धरून वाघ्यामुरळीच्या पथकाला मंत्री दानवे यांनी साथ दिली. यामुळं कार्यक्रमात मोठी रंगत आली होती. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Web Title: Raosaheb Danve Played The Instrument In Program Bhokardan Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusRaosaheb Danve
go to top