esakal | सोलापूरच्या लॉकडाऊनसोबतच रॅपिड टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटचा आराखडा 
sakal

बोलून बातमी शोधा

bharne mama

सिव्हीलची केली पाहणी 
लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनबाबत सूचना केल्या. बैठकीस डॉ. वैश्‍यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते. 

सोलापूरच्या लॉकडाऊनसोबतच रॅपिड टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटचा आराखडा 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहराच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने रॅपिड टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यांचा आराखडा तयार करावा. को-मॉर्बिड नागरिकांची तपासण्या कराव्यात. संशयास्प्द व्यक्तींचे अलगीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिल्या. सोलापुरातील श्री शिवाजी छत्रपती सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) 100 बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येत्या दहा दिवसात सुरु होईल अशी माहितीही त्यांनी दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी  सिव्हिल हॉस्पिटल येथे बी वॉर्डला भेट देवून पाहणी केली. तेथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विकसित करण्यात येणाऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलबाबत माहिती दिली. सोलापुरातील लॉकडाऊनबाबत सात रस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, किसन जाधव, रियाज खैरादी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंह पवार उपस्थित होते.