खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले मोठे विधान; म्हणाले...

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याबाबत केले मोठे वक्तव्य.

पुणे : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, अशा आशयाचे पत्र अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यास पाठिंबा नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर आता शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत 'साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण' अशा शब्दांत शरद पवारांना पाठिंबा दर्शवला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (शनिवार) सकाळी आठच्या सुमारास झाला. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा आहे, अशा स्वरुपाचे पत्र दिले. मात्र, अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना उघड पाठिंबा दर्शवला. त्याबाबतची फेसबुक पोस्टच त्यांनी केली. त्यामध्ये साहेब (शरद पवार) ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण, असे त्या पोस्टमध्ये लिहिले. 

अमृता फडणवीस म्हणतात, फडणवीस-अजित पवारांनी करून दाखवलं!

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयी

डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यानुसार शिरूरमधून ते विजयी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of MP Amol Kolhe after Maharashtra Government Formation