
जलयुक्त शिवारला क्लीन चीट मिळाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर (Jalyukt shivar scheme) कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी (mahavikas aghadi government) सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारला क्लीन चीट (clean chit to jalyukt shivar scheme) दिली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: समीर वानखेडेंच्या नियुक्तीत अमित शाह कनेक्शन? पत्रातून गंभीर आरोप
''जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी नक्की असू शकतात. मी न्यायालयात एक रिपोर्ट दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, ६ लाख कामांसाठी ६०० कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरं झालं असतं. पण, ६०० कामांसाठी पूर्ण योजनाच चुकीची होती, असं म्हणणं बरोबर नाही'', असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीसांवर अनेकदा टीका करण्यात आली. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले असून हा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेलं उत्तर आहे, असंही फडणवीस म्हणाले.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅगने फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर काही आक्षेप घेतले होते. कॅगच्या अहवालात ४ जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचे सांगितले होतं. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल समोर आला असून जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. तसेच जलयुक्तमुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमान दर्जातही वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे.
Web Title: Reaction Of Devendra Fadnavis After Thackeray Government Gives Clean Chit To Jalyukt Shivar Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..