खूशखबर! एसबीआयमध्ये नोकरीची संधी; कसा करायचा ऑनलाइन अर्ज जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

कोरोना व्हायरसमुळे काही ठिकाणी कामगार कपात होत आहे. तर काही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून काही उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी त्याचा अजूनही परिणाम दिसत आहे. पुर्ण क्षेमते उद्योग व व्यवसाय सुरु करण्यात आडचणी येत आहेत.

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे काही ठिकाणी कामगार कपात होत आहे. तर काही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून काही उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी त्याचा अजूनही परिणाम दिसत आहे. पुर्ण क्षेमते उद्योग व व्यवसाय सुरु करण्यात आडचणी येत आहेत. त्यातच नोकऱ्या गेलेल्यांच्यापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. बेरोजगारांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र, अशात काही संधीही निर्माण होत आहेत. दोन दिवसांपूर्वी महावितरणमधील प्रलंबीत नोकरी भरती करण्याचा निर्णय झाला आहे. आता बँकींग क्षेत्रात काम करु इच्छीणाऱ्यासाठी गुड न्यूज आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडेर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एसबीआयच्या ऑफिशिअल संकेतस्थळावरुन या पदासाठी अर्ज करता येणार आहे.  यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.  हा अर्ज करण्यासाठी ओळखपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. कागदपत्रांच्या व्हेरिफेकेशनशिवाय शॉर्टलिस्टिंग पूर्णपणे मान्य होणार नाही. मुलाखतीसाठी बोलावण्यात आले तर त्यावेळी मुळ कागदपत्र नेणे आवश्यक आहे. 445 पदांसाठी ही नोकरभरती आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असल्याने अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. sbi.co.in या लिंकवर क्लिक करून एसबीआयने विविध पदांसाठी जारी केलेल्या नोटिफिकेशन संदर्भात माहिती मिळवू शकता. या भरतीकरता कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही आहे. 

कसा कराल अर्ज?
- https://www.sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा
-रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करून तुम्हाला हव्या असणारी पदासाठी तुम्ही अर्ज करू शकाल
- नवीन पेज उघडल्यावर त्याठिकाणी तुम्हाला लॉगइन किंवा रजिस्ट्रेशन करावे लागेल
- त्याठिकाणी असणारा अर्ज भरून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा
- त्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the detailed story to apply online for a job in SBI