Jayant Patil : सर्वांत मोठ्या तुटीच्या अर्थसंकल्पाचा विक्रम

अर्थसंकल्पात नवीन रोजगारावर चर्चा नाही. नवउद्योजक, महिलांसाठी काहीच नाही.
Jayant Patil
Jayant Patilsakal
Updated on

‘अर्थमंत्री म्हणून अजित पवार हे ११ वा अर्थसंकल्प मांडत आहेत. हा जसा विक्रम आहे, तसेच आताचा हा अर्थसंकल्प तुटीचा असून ही तूट ४६ हजार कोटी सांगितली जात असली तरी ती ५० ते ६० हजार कोटीची असेल. त्यामुळे हा देखील एक विक्रम असेल,’ अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केली.

अर्थसंकल्पी चर्चेत बोलताना ते म्हणाले, ‘या अर्थसंकल्पात नवीन रोजगारावर चर्चा नाही. नवउद्योजक, महिलांसाठी काहीच नाही. डबल इंजिन सरकार म्हणतो, मात्र निवडणूक संपल्यावर केंद्र सरकारकडून येणाऱ्या अनुदानात कपात होते. २०२३-२४ मध्ये ६५ हजार ४४४ कोटी आणि २०२४-२५ मध्ये ५२ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

राज्याचा करातील वाटा ६९ हजार कोटींवरून ७७ हजार कोटींवर गेला आहे. तरीही ही वागणूक दिली जाते. राज्यातील शेतीचा विकास दर चांगला आहे. मात्र, त्यालाच केवळ सात हजार कोटींची तरतूद कमी केली आहे.’

कृषिमंत्र्यांना चांगले काम करायचे असेल तर चांगला अर्थसंकल्प दिला पाहिजे. त्यातच गुंतवणूक जास्त केली तरच विकास होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. आमदार विजय वडेट्टीवार,सुनील प्रभू, रोहित पवार, सीमा हिरे, चंद्रदीप नरके आदींनी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभाग घेतला.

जयंत पाटील यांची कविता -

महाराष्ट्र आता थांबणार नाही

सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही

गुन्हेगारी थांबणार नाही, रक्तपात रोखणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही

पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही

आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही

रोजगार देणार नाही, शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही

‘एकनाथांना’ दूर सारायची योजना

‘मागच्या अर्थसंकल्पी भाषणात अजित पवार यांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केले आहे. अजित पवार तुकोबांपासून दूर गेले, हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता ‘एकनाथांना’ही दूर सारायची योजना तयार केलेली आहे,’ असा टोला जयंत पाटील यांना लगावताच सभागृहात हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com