महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी भरती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठीच्या 865 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठीच्या 865 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव आणि तपशील : पदाचे नाव आणि संख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 35 पदे
शैक्षणिक अर्हता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी) : 09 पदे
शैक्षणिक अर्हता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

लघुलेखक (निम्न श्रेणी) : 20 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वरिष्ठ लेखापाल : 04 पदे
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम

सहाय्यक : 31 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी.

लिपिक टंकलेखक : 211 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि एमएच-सीआयटी

भूमापक : 29 पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (भूमापक), ऑटो कॅड

वाहनचालक : 29 पदे
शैक्षणिक अर्हता : 7 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि 02 वर्षे अनुभव

तांत्रिक सहाय्यक : 34 पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा आयटीआय (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)

जोडारी : 41 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर)

पंपचालक : 79 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वायरमन)

विजतंत्री : 09 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन)

शिपाई : 56 पदे
शैक्षणिक अर्हता : किमान चौथी उत्तीर्ण

मदतनीस : 278 पदे
शैक्षणिक अर्हता : किमान चौथी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय उमदेवारांना 05 वर्षे सूट)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 ऑगस्ट 2019

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळास भेट द्या : https://bit.ly/2XNFDwV

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील संकेतस्थळास भेट द्या : 
https://mahapariksha.gov.in


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment for 865 posts in Maharashtra Industrial Development Corporation