Ajit Pawar : आरोग्य विभागात मोठी भरती! नवीन रुग्णालयांना मंजुरी अन् पदभरतीसंदर्भात अजित पवारांचे निर्देश

ajit pawar meeting
ajit pawar meetingesakal
Updated on

मुंबईः कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणेचं महत्व सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात अनेक नवीन रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबर पदभरतीसंदर्भात निर्देश दिले आहेत.

ग्रामीण भागामध्ये नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे. त्यामुळेच मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, वरुड, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश अजित पवारांनी गुरुवारी दिले.

गुरुवारी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ajit pawar meeting
Teacher Recruitment : शिक्षक भरतीत ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

या बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपक्रेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या मंजुऱ्यांसदर्भात सविस्तर चर्चा झाली. रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ज्याठिकाणी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असं पवारांनी सांगितलं.

आरोग्य विभागातील पदभरतीसंदर्भात अजित पवार म्हणाले की, आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी.

ajit pawar meeting
Video : ''वडील म्हणून पवार साहेब कसे आहेत?'' सुप्रिया सुळेंनी सांगितली आठवण

या बैठकीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष, तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते, डॉ. किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावरुन राज्यात लवकरच मोठी आरोग्य कर्मचारी भरती होईल, असं दिसून येत आहे. 'महासंवाद'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com