मुंबई - प्राथमिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडी गैरव्यवहाराची धग शमत नाही तोच, राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील काही सहसंचालकांनी बेकायदेशीर शिक्षकेतर भरती केल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि मुंबई येथील कार्यालयांत अशी प्रकरणे उघडकीस आली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.